Pages

Monday, 4 October 2010

एक प्रवास नृसिंह वाडीचा........

शुक्रवारी संध्याकाळी ऑफिस सुट्ताना अमोल वाघ ने मला विचारले काय रे उद्या काय करतोयस ? काही स्पेशल प्लानिंग ?
 खर तर २ ऑक्टोबर म. गांधी जयंती सलग जोडून रविवार ची सुट्टी माझे खर तर काही प्लान नव्हते, पण अगदीच घरी जावून निवांत पडून राहणे मला आवडत नाही, जेव्हा जेव्हा सुट्टी मिळते तेव्हा बाहेर फिरायला जायचे ठरवतो. प्रत्येक वेलेस दुसरे कोणी सोबत असेलच असेही नाही. एखाद्या निवांत ठिकाणी जाउन मनसोक्त निसर्ग पहावा अन्यथा एखाद्या धार्मिक ठिकाणी जाउन डोके टेकावे, मन प्रसन्न करावे की जेणे करून पुढच्या प्रवास सुखकर व्हावा याचे सदैव प्लानिंग करत राहतो. ही त्या दृष्टीने फारच  छान संधि आहे असा विचार करून शेवटी त्यालाच मी विचारले, काही स्पेशल ? त्यावर तो म्हणाला अरे आपल्याला नृसिंह वाडीला जायचे आहे! अस ऐकल अन मी सुधीरच्या बरोबर गेलेलो होतो तो प्रसंग आठवला.......